संदेश

कापूस कोंड्याची गोष्ट

              रेवा ने तावातावाने बेड वर दप्तर फेकलं, आणि बडबड करत बाथरूम मध्ये घुसली. आईला कळून चुकलं होतं. हिचा रात्रीचा राग काही अजून गेला नव्हता. कालच तिचा मामा तिला भेटायला म्हणून खास पुण्याहून गावी आला होता. रेवा खूपच आनंदी होती. दिवसभर दोघांनी खूप धिंगा मस्ती केली. रात्री जेवणं आटोपल्यावर सर्व जण गप्पा मारत बसले होते. गोष्टी मागे गोष्टी सुरू झाल्या. आई आपल्या गोष्टी सांगू लागली, तर बाबा ही आपल्या लहान पणीच्या गोष्टी सांगू लागले. रेवाला खूप मज्जा येत होती. ती त्या गोष्टीत इतकी रमली होती की, तिला एक संपली की लगेच दुसरी गोष्ट हवी होती. त्याच त्याच जुन्या गोष्टी तिला नको वाटत होत्या. तितक्यात  तिच्या मामाने तिला छेडायला म्हणून प्रश्न केला. रेवा, कापूस कोंड्याची गोष्ट सांगू....? ती म्हटली "हो सांग ना !" हो सांग ना काय म्हणते, कापूस कोंड्याची गोष्ट सांगू....? हो ! हो काय म्हणते, कापूस कोंड्याची गोष्ट सांगू....? सांग ना रे लवकर सांग ना रे लवकर काय म्हणते, कापूस कोंड्याची गोष्ट सांगू....? ती वैतागली आणि म्हटली. शी बाबा, तू खूप डोकं खातोय मामा... शी ...

मृत्यूनंतरचे पत्र

प्रिय………               सखी,      कशी आहेस.......?  मजेत नक्कीच नसशील, माहिती आहे मला !  कारण तुझ्या उदास चेहऱ्यावरून असं दिसतय की, तू  खूप विचलीत आहेस. पण तुला आता मजेत रहायला शिकायला हवं!  मला चिंता वाटते गं सखे तुझी कारण आता तू मनापासून खचली सुद्धा आहेस. खचायचं कारण ही तसंच आहे म्हणा!  मी असा अचानक, तुला अर्ध्यावर सोडून निघून आलो. सर्व घरादाराची जबाबदारी, तुझ्यावर सोपवून आलोय. माझे म्हातारे आई-बाबा, आपली दोन चिल्ली-पिल्ली, आणि साऱ्या घराचा पसारा.....  कसं सांभाळशील गं हे सगळं?  याच विचारात मी अजून ही तुझ्या आजूबाजूला भटकतोय. म्हणून तुला हे पत्र लिहण्याचा खटाटोप केला. नाहीतर मेल्यानंतर कुणी कुणाला पत्र लिहतयं का? वेडे ……!  पण मी लिहतोय, कारण तुला काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात. तर गोष्ट अशी आहे की, मी तुला आर्थिक दृष्टीनं भक्कम करून आलोय खरा, पण मनाने……… मनाने तर तू अजून ही खूप कोवळी आहेस . परंतु आता तुला हे कोवळं मन अगदी कठोर करायची  वेळ तुझ्यावर आली आहे. अन्यथा तुला हा बेगडी समाज, सुख...

तुझं कौमार्य शाश्वत आहे

तुझं कौमार्य शाश्वत आहे !                  वयाची तिशी पार झाली तरी स्वेताचं लग्न काही जुळून येत नव्हते, त्यामुळे तिची आई सरला अस्वस्थ राहू लागली होती. पोरीचं लग्न का होत नाही याचं कारण तिला काही उमगतच नव्हतं. स्वेताचं घर माझ्या अगदी घरासमोर होतं. ती माझ्या पेक्षा वयानं 5 वर्ष मोठी असल्याने मी अगदी तिच्या अंगा खांद्यावर खेळलोय असं म्हणायला काही हरकत नव्हती. माझे वडील सैन्यात नोकरीला असल्यानं घरातली सगळी कामं आईलाच करावी लागायची. आणि स्वेता तिच्या आईच्या उदरात असतांनाच तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या घरातील कामाची जबाबदारी तिच्या आईवर येऊन पडली होती. साधारणतः माझी आई आणि तिची आई पती विरह या नात्याने समदुखी असल्यानं दोघींमध्ये एक वेगळाच जिव्हाळा निर्माण झाला होता. तिच्या आई वडिलांच्या लग्नानंतर लगेचच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आणि माझ्या आई वडिलांना लग्नाच्या पाच वर्षानंतर माझ्या रुपात पुत्र रत्न प्राप्त झाले होते. आमचे आई वडील जरी समवयस्क असले ...

माझ्या बायकोचा नवरा ?

माझ्या बायकोचा नवरा ?           विचित्रच वाटतंय ना ! सुरवातीला मला ही जरा विचित्रच वाटलं होतं. अरे असाही काही विषय असू शकतो का? लोकं किती सहज घेतील ही गोष्ट, किती जणांना पटेल ...

वांझोटी

वांझोटी             नुकतीच देवकीनं वयाची पस्तीशी ओलांडली होती. लहान भाऊ बहिणीचं लग्न , माय बापाचं आजारपण , सात माणसांच्या परीवाराचं रोजचं खाणं पिणं सगळी जबाबदारी तिच्य...