मृत्यूनंतरचे पत्र
प्रिय……… सखी, कशी आहेस.......? मजेत नक्कीच नसशील, माहिती आहे मला ! कारण तुझ्या उदास चेहऱ्यावरून असं दिसतय की, तू खूप विचलीत आहेस. पण तुला आता मजेत रहायला शिकायला हवं! मला चिंता वाटते गं सखे तुझी कारण आता तू मनापासून खचली सुद्धा आहेस. खचायचं कारण ही तसंच आहे म्हणा! मी असा अचानक, तुला अर्ध्यावर सोडून निघून आलो. सर्व घरादाराची जबाबदारी, तुझ्यावर सोपवून आलोय. माझे म्हातारे आई-बाबा, आपली दोन चिल्ली-पिल्ली, आणि साऱ्या घराचा पसारा..... कसं सांभाळशील गं हे सगळं? याच विचारात मी अजून ही तुझ्या आजूबाजूला भटकतोय. म्हणून तुला हे पत्र लिहण्याचा खटाटोप केला. नाहीतर मेल्यानंतर कुणी कुणाला पत्र लिहतयं का? वेडे ……! पण मी लिहतोय, कारण तुला काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात. तर गोष्ट अशी आहे की, मी तुला आर्थिक दृष्टीनं भक्कम करून आलोय खरा, पण मनाने……… मनाने तर तू अजून ही खूप कोवळी आहेस . परंतु आता तुला हे कोवळं मन अगदी कठोर करायची वेळ तुझ्यावर आली आहे. अन्यथा तुला हा बेगडी समाज, सुख...